Chiplun – Kolthare – Chiplun

हम जो चलने लगे, चलने लगे हैं ये रास्ते!

तर हि कथा आहे एका कुटुंबाची त्यातल्या मुख्य माणसाला अर्थात कर्त्या पुरुषाला सायकल चालवण्याचं भरपूर वेड आहे. त्याचं हे वेड बघून त्याचा मुलगा देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सॉरी पॅडल वर पॅडल मारून ते वेड सार्थ ठरवतोय. सायकल चालवणं तब्येतीसाठी कसं चांगलं आहे हे पटवून या माणसाने त्याच्या बायकोला देखील नादी लावलं आहे. आता जमेल तेव्हा हे तिघे जण सायकलवरून चकरा मारत असतात. तर हि अशी वेडी ‘’The Cycling Family’’ म्हणजेच आम्ही तिघे… मी, नवरा श्रीनिवास नि मुलगा ईशान (वय वर्ष ८ पूर्ण). मागे एकदा माझ्या माहेरी ३५ किमी ची राईड ईशान ला घेऊन केली होती http://shrigokhale.in/cycling-together/  जाताना ३५ किमी आणि  दुसऱ्या आठवड्यात परत येताना ३५ किमी . दोन्ही राइड्स ईशान ने खूपच छान झेपवल्या होत्या. आता परत यावेळी त्याला मोठ्या राईड ला न्यायचा का असा विचार चालू होता. जवळपासची ठिकाणं झाली होती. मग जरा लांबच ठिकाण आम्ही निवडलं. ते म्हणजे दापोली तालुक्यातील कोळथरे हे माझ्या बहिणीचं गाव.

मागच्या दिवाळीत मी आणि श्रीनिवास सायकलने चिपळूण- खेड- दापोली- कोळथरे – गुहागर – वेळणेश्वर – चिपळूण असा दौरा करून आलो होतो http://shrigokhale.in/%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%82-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80/. चिपळूणहून खेड- दापोली मार्गे कोळथरे ८० किमी होतं . पण तेच धोपावे- दाभोळ फेरी बोट मार्गे ७० किमी होत. म्हणून मग आम्ही हाच रूट फायनल केला. आता प्रश्न होता सुट्ट्यांचा…. श्रीनिवास ला Winter Break ची ८-10 दिवस सुट्टी असते. पण ईशान ची मराठी शाळा असल्याने त्याला फक्त १ च दिवस सुट्टी होती त्यामुळे २/३ दिवस शाळेला बुट्टी मारायची ठरवली. मग ३० डिसेम्बर ला जायचं, ३१ तारखेला राहायचं, विश्रांती घ्यायची आणि १ तारखेला निघायचं ठरवलं. त्याप्रमाणे ताईला कल्पना दिली आणि मग तयारीला सुरवात केली. माझी प्रॅक्टिस शून्य म्हणावी अशी होती. १०/१५ किमी सायकल चालवणे जमून जायचे. पण आता एका दिवसात ७० किमी करायचे होते. ईशानने पण बरेच दिवसात मोठी राईड केली नव्हती त्यामुळे त्याला देखील प्रॅक्टिस ची गरज होती. मग रोज सकाळी उठून मी आणि ईशान जवळपासच्या रस्त्यांवर सायकल चालवायला जायला लागलो. रोजचे कमीत कमी १२/१५ किमी करायचो नि परत यायचो. यंदा डिसेम्बर संपत आला तरी थंडीचे नाव नव्हते त्यामुळे सकाळी उठणं फारसं त्रासदायक नव्हतं. रोज सकाळी साधारण ७ किंवा ७. ३० ला निघायचो. कोकणातल्या रस्त्यांवर फक्त चढ उतारच असतात. क्वचितच सपाटी मिळते . त्यामुळे आम्ही जो रोजचा सर्व करायचो तेव्हढ्या किमी मध्ये सुद्धा बारीक सारीक आणि तीव्र! असे चढ उताराचे सगळे प्रकार असायचे. सकाळी उठताना ईशान कंटाळे पण target ची आठवण करून दिली कि उत्साहात येई. साधारण ३ आठवडे आम्ही रोज सकाळी सराव केला आणि मग जाण्यासाठी सज्ज झालो. त्याआधी सायकल Takle Cycles  दुकानात दाखवून फिट करून घेतल्या .

३० तारखेची सकाळ उजाडली. सकाळी ५ ला उठलो. एकीकडे अंडी उकडत टाकली. दुसरीकडे माझ्यासाठी ऑम्लेट बनवून घेतलं. ते झाल्यावर चहा बनवला. हे सगळं होईपर्यंत बाकी तयारी केली. थोड्या वेळाने ईशानला उठवलं. श्रीनिवास आणि ईशान दोघांनी उकडलेली अंडी खाल्ली आणि उरलेली बरोबर घेतली. केळी घेऊन ठेवलीच होती. Electrol पावडर, Gluco Vita Bolt च्या गोळ्या अशी सगळी जय्यत तयारी होती. ४ बाटल्या पाणी भरून घेतलं. बाकी लागल्यास वाटेत बाहेरून घेऊ असा विचार केला. सगळी तयारी होऊन आम्ही बरोबर ६ ला चिपळूण हुन निघालो. सुरवातीला चांगलाच अंधार होता. पण स्ट्रीट लाईट्स असल्याने तशी चिंता नव्हती शिवाय सायकलला टॉर्च लावलेली होतीच. हळूहळू चिपळूण क्रॉस करून आजूबाजूची छोटी गावं पण पाठी टाकली आणि मग विरळ वस्ती, अंधार आणि तुरळक वाहनं लागायला लागली. हळू हळू दिसायला लागलं , पण दाट धुकं होतं.

Before Ganesh Khind... one ca see the fog behind
The Cycling Family fighting the fog en-route Kolthare!

शिरळ गाव पाठी टाकलं आणि  गणेश खिंडीच्या चढला सुरवात झाली  पण, हळूहळू चढत जाणारा असल्याने सायकलींच्या दृष्टीने चांगला :). सकाळची फ्रेश सुरवात असल्याने आम्हाला देखील चढ असला तरी दमायला झालं नव्हतं. मध्येच एक पाण्याचा छोटा ब्रेक घेऊन सायकल चालवत होतो. सायकलींगच्या बाबतीत ईशान कायमच मला पाठी टाकत आलाय पण तो कधी श्रीनिवासशी स्पर्धा करायला जात नाही. मला मात्र तो सहज हरवतो त्यामुळे थोडं पाठी राहायचं नि मग बेल वाजवत माझ्या पुढे निघून जायचं हे त्याच आवडत काम आहे. चढ म्हटले कि मी मनानेच आधी दमते. त्यामुळे हे दोघे पूर्ण खिंडीचा चढ चढून माझी वाट बघत एका शेड मध्ये थांबले होते. ‘’स्लो बट स्टेडी’’ यानुसार मी सायकल चालवत त्यांच्यापाशी पोहोचले. मग जरा नीट बसून पाणी पिऊन झाल्यावर परत पॅडल मारायला सुरवात केली. आता साधारण ३ किमी चा उतार होता. सायकली सुसाट सोडल्या. उतारावर अर्थात मी पुढे. ईशान सुसाटत येतो पण त्याला कंट्रोल करावं लागत त्यामुळे श्रीनिवासला ईशानच्या बरोबरीने त्याला सांभाळत यावं लागतं. उतार संपल्यावर तांबी चा पूल लागला इथे मगरी दिसतात कधीकधी पण, आम्ही गेलो तेव्हा पूर्ण धुकं पाण्यावर पसरलं होतं. तिथेच पुलावर फोटो काढला नि परत सुरवात केली.

आता रामपूरच्या घाटीचा चढ लागला हा देखील जवळपास 4 किमीचा चढ आहे.  दुर्दैव म्हणजे इथे चढानंतर उतार नाही…   परत एकदा ईशान श्रीनिवास पुढे नि मी कासवाच्या गतीनं मागे असे सुरु झालो. आता रस्त्याला जरा वाहनांची गर्दी सुरु झाली. लोकं कौतुकाने ईशान कडे बघत होती. आता पूर्ण घाटी चढून रामपूर  गावात जाऊन दोघे माझी वाट बघत थांबले. मी देखील त्यांच्या पाठोपाठ जाऊन थांबले. मध्ये मध्ये ग्लुको विटा बोल्ट च्या गोळ्या तोंडात टाकत होतो. यापुढे मार्गताम्हाने गाव लागते. तिथून पुढे वेळणेश्वर फाटा लागतो. तिथे आम्ही जरा थांबलो. बरोबरची अंडी, केळी खाऊन घेतली. Electrol च पाणी बनवून घेतलं. आताशी कुठे २० किमी अंतर कापून झालं… अजून ५० किमी बाकी होत. पोरग जरासुद्धा थकलं नव्हतं. उलट उत्साहात होत. तिथून निघालो नि  १० किमी वर शृंगारतळीपर्यंत आलो. इथून पुढे उजवीकडे वळून धोपावे जेटीकडे रस्ता जातो . तळीवरून २० किमी वर जेटी होती. इथे चढ एके चढ सुरवात झाली. साधारण ४ किमी चढाला १ किमी उतार या प्रमाणात चढ होते. आताशा ऊन देखील डोक्यावर यायला लागल्याने थोड जास्त थकायला होत होत. आश्चर्य म्हणजे चढाच्या वेळी रस्ता गुळगुळीत आणि थोडा जरी उतार आला तरी त्यात खड्डे. ज्यामुळे उताराच्या स्पीड ने पुढचा चढ चढवायचे बेत रस्त्यावरच्या धुळीत मिसळत. “अगं थोडेसेच चढ आहेत!” हे श्रीनिवासचं वाक्य निरर्थक वाटे. रस्ता माहितीचा असला तरी हे छोटे छोटे चढ असे त्रासदायक होतील वाटलं नव्हतं. जेव्हा हा प्लॅन केला तेव्हा गणेश खिंड,  रामपूरची घाटी आणि दाभोळचा चढ एवढ़ेच मोजले होते. छोटे-मोठे चढ हे असणार असं गृहीत धरलं होत. पण हे छोटे छोटे करत फक्त चढच लागत होते. उताराचं नाव नव्हतं. Enron / RGPPL च्या प्रकल्पा  नंतर मोठा उतार आहे हे माहित होतं, केवळ तो उतार उतरायचा आनंद मिळणार म्हणून हे सगळे चढ चढवायचे कष्ट मी उपसत होते. शेवटी एकदाचं Enron / RGPPL चं गेट आलं आणि उताराला सुरवात झाली. हा उतार एकदम तीव्र स्वरूपाचा आहे आणि रस्ता देखील एकदम चांगला. त्यामुळे सायकलने जाताना मजा आली. इथे ठरवल्यासारखे मी पुढे नि हे दोघे मागे.  उतार उतरल्यावर परत एक तीव्र चढ आहे. इथे मात्र अगदी लो गिअर वर पण सायकल नेता येईना . ईशान सुद्धा दमला होता. मग आम्ही दोघांनी हातात सायकल धरून चढ चढवला. परत आता जेटी पर्यंत शेवटचा उतार. श्रीनिवासने पुढे जाऊन तिकिटे काढली होती. ईशानला पुढे ठेवून मी पाठी होते. सायकल आणि सायकलस्वार लहान मुलगा बघितल्यावर २-३ जण उत्सुकतेने पुढे आले. कुठून आलात? कुठे जाणार? प्रश्नाची सरबत्ती झाली . बर्याचश्या प्रश्नांना ईशानने उत्तरे दिली. सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं. काहींनी पाठ थोपटली. ईशानला त्यामुळे उत्साह आला. माझ्या स्लो जाणण्याचे आमची ११ ची फेरी चुकली होती. त्यामुळे ११.३० च्या फेरीपर्यंत सक्तीची विश्रांती झाली तिथे.

The bicycles loaded!
View from the Ferry Boat!

धोपावे- दाभोळ फेरीबोटीच अंतर खुपच कमी आहे १५ मिनिटात इकडून तिकडे गेलो. आता दाभोळ चा चढ चढायचा होता. याआधी अनेकदा या रस्त्यावरून गेल्याने कल्पना होती. ईशान ला कल्पना दिली कि साधारण ३-४ किमीचा चढ असेल. अगदी सुरवातीलाच तीव्र चढ असल्याने सायकल हातात घेऊन चालायला सुरवात केली. या चढाने पूर्ण दमछाक केली. काही केल्या मेला चढ संपेना. कधी एकदा टॉप करतो नि उतार लागतो असं झालेलं. मध्ये मध्ये मी माझ्या सोयीने थांबत पाणी पीत चढत होते. येताना काय माझ्याच्याने हे झेपणार नाही असं म्हणून मी येताना एस टी ने येणार असं डिक्लीअर करून टाकलं. श्रीनिवास नि ईशान दोघेही चिडवायला लागले. पण आता पाय दुखत होते. अवघे १० किमी उरले होते. शेवटी एकदाचा कोळथरे चा फाटा आला. थोडासा सपाट रस्ता झालयावर पंचनदी गावाचा मोठा उतार लागला. हुश्श झालं. या उतारावरून मी मुद्दाम पाठी होते . ईशान ज्या स्पीड ने सायकल उतरवत होता ते पाहून माझ्यातली काळजीवाहू आई जागी झाली . क्षणभर भीती वाटली. मी याहीपेक्षा जास्त स्पीड ने सायकल चालवते. पण आज तिथे ईशान ला बघून धडधडलं! ईशान च्या पाठी श्रीनिवास होता. पण तरीही न राहवून मी श्रीनिवासलाच ४ सूचना केल्या. त्याला हळू जायला सांग, ब्रेक लावायला सांग, इत्यादी. श्रीनिवास वैतागला नि मला पुढे जायला सांगितलं आणि मग पाठून दोघे आरामात आले. यथावकाश तेही अंतर पार करून आम्ही एकदाचे घरी पोचलो.

Runkeeper data…. Saddle time!

घरी पोचल्यावर मला एकदम सुटल्यासारखे झाले. हुश्श करून बसलो . ईशानला पण काहीतरी  साध्य केल्याचे समाधान मिळाले. सगळे जण कौतुक करत त्यामुळे त्याला एकदम मजा वाटत होती. ताईने तर शब्दशः त्याच्यासमोर हात जोडले.

भाच्याचा वाढदिवस असल्याने मस्त बासुंदीचा बेत होता. त्यामुळे जेवणावर आडवा हात मारला. थोडी वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळी समुद्रावर. सुदैवाने इथे गर्दी नसते, मोठा लांब रुंद स्वच्छ किनारा सकाळी एवढी रपेट करूनही ईशान दमला नव्हता आणि भाच्याबरोबर पाण्यात डुंबकत होता.

रात्री भाच्याचे मित्र मैत्रिणी येऊ छोटसं घरगुती सेलिब्रेशन करून दिवस संपला. थोड्याफार गप्पा मारून आम्ही मस्त  रात्री १० ला झोपलो..

नवीन वर्ष ….

१ तारखेला सकाळी ५ .३० ला उठून तयार झालो. सकाळी परत थोड्याश्या चहा बरोबर गप्पा झाल्या . आणि ७ वाजता कोळथरे हुन सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो . पंचनदी फाट्यावर कोळथरे ला मागे टाकून थोडा सपाट रस्ता लागला आणि मग काल लागलेला उतार आज चढाच्या रूपात समोर आला. सुरवातीला बराचसा चढ चढल्यावर एक तीव्र वळणावर मात्र थकून सायकल हातात धरून ते वळण पार केलं. परत सायकल वर चढून सावकाश का होईना पण चढ चढत होते. परवासारखे श्रीनिवास नि ईशान पुढे होते नि मी मागाहून. परवा येताना ४ किमी चढला १किमी उतार असं असणार गणित आज ४किमी उताराला १ किमी चढ असं अपेक्षित होत . पण हे सगळं मानसिक असतं, प्रत्यक्षात असं काहीच नसतं. लहानपणी गोष्टीत ऐकलेल्या जादू प्रत्यक्षात घडतात आणि ते रस्ते परत ४ किमी चढाला  १ किमी उतार याच प्रमाणात समोर येतात असा अनुभव आला.  चढ चढताना दमछाक होत होती. तरीही सकाळची वेळ होती. आजूबाजूला लोक स्वेटर घालून फिरत होते नि आमच्या मात्र घामाच्या धारा लागल्या होत्या.

शेवटी एकदा पूर्ण चढ चढून झाल्यावर एकदाचा दाभोळ जेटी ला जाणारा मोठा उत्तर लागला. सुसाट स्पीड ने तो उतार उतरून जेटी वर आलो तो नुकतीच फेरी बोट गेली होती. अर्धा तास आमचा मग तिथेच गेला. मग जरा सेल्फी वगैरे झाले. स्टेट्स अपडेट केलं.

Our Cycles!
Loaded bay!

फेरी बोटीने पलीकडे धोपावे ला लागलो. काल उतरलेला उतार चढ होऊन वाट बघत होता.  आधीसारखाच एक शार्प टर्न हात सायकल घेऊन मी नि ईशान ने चढवला आणि मग पॅडल मारत निघालो. Enron/ RGPPL च्या गेट पाशी चढ संपला. इथे माझ्या मैत्रिणीचं हॉटेल आहे ‘’पूर्णब्रह्म’’. ती माझी मैत्रीण आणि तिचा नवरा श्रीनिवासचा मित्र त्यामुळे फॉर्मॅलिटी नसते. स्टेटस ला टाकेलला फोटो बघून तिने अंदाज केला होता की आम्ही कदाचित भेट देऊ. त्याप्रमाणे आम्ही नाश्त्याला तिथेच थांबलो. मस्त मिसळपाव नि ईशान चा आवडता शिरा असा भरपेट नाश्ता झाल्यावर परत एकदा सायकल चालवायला सुरवात केली.

Riding at Dhopave!
Woods are lovely dark and not so deep!

उताराचा मस्त आनंद घेत आणि थोडाफार चढ चढत शृंगारतळी पर्यंत आलो. आता इथून चिपळूण पर्यंत राज्य महामार्ग होता. रुंद रस्ता आणि छोटे मोठे चढ उतार. आताशा ११ वाजून गेले होते. चिपळूणला पोहोचायला किमान २ वाजतील असं दिसत होतं. पॅडल मारण चालू होतं. मार्गताम्हाने येईपर्यंत बऱ्यापैकी थकायला झालं होत. आज ईशान पण मध्ये मध्ये थकल्यासारखा वाटत होता. पण आपण आईच्या पुढे जातोय यातही त्याला आनंद होता. शिवाय येणारे जाणारे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. काही मोठ्याने कमेंट करत होते. एका बुलेट वाल्याने त्यांच्या पाठून जाऊन थोडा वेळ शूटिंग करून  दोघांचे फोटो काढून घेतले . एके ठिकाणी पाणी प्यायला थांबलो असता एकाने अगदी छोटीशी मुलाखत घेतली. ईशान हा कौतुकाचा विषय झाल्याने तो खुश होता. रामपूर ची काल चढलेली घाटी आता उतरायची होती. तिथे फक्त उतार होता. त्या आशेवर कितीतरी वेळ रस्ता कापत होतो. वरच्या लेखाच्या नावाप्रमाणे “हम जो चलने  लगे चलने लगे हे ये रास्ते ” या गाण्याप्रमाणे रस्ता देखील आमच्याबरोबरीने जात होता आणि शेवट रामपूर गाव आलं आणि उताराला सुरवात झाली. उतार भन्नाट वेगाने उतरल्यावर परत एकदा तांबीचा पूल क्रॉस केला आणि गणेश खिंडीचा चढ सुरु झाला. ईशानला encourage करण्यासाठी वेळोवेळी अंतराची कल्पना देत होतो. गणेश खिंडीचा चढ देखील हळूहळू चढत जाणारा असल्याने (gradual) थांबत थांबत परंतु सायकलवरूनच सगळा चढ चढून गेलो आणि मग परत सुसाट वेगाने खिंड उतरलो. शिरळ गाव आलं तसा खडबडीत रस्ता सुरु झाला. भूक लागली होती. ईशानच्या या सगळ्या Ride बद्दल त्याला Pizza treat द्यायची ठरवलं आणि त्यामुळे सायकली डॉमिनोज पिझ्झा कडे वळल्या. ८ वर्षांच्या ईशानने Non Gear Cycle वर ७०- ७० किमीचं अंतर कापलं हीच आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सगळेच त्यामुळे खुश होतो. भरपेट पिझ्झा खाल्ला आणि ईशानचा आवडता चोको लावा केक पण.   

He totally deserves it!

अशा तर्हेने आमची आणि ईशान ची महत्वाची राईड कम्प्लिट झाली . ईशान एकदम फुल ऑफ एनर्जी होता. तिकडे गेल्यावर काय किंवा इकडे आल्यावर काय त्याला खेळायचा उत्साह तसाच होता. ईशान साठी एक अचिव्हमेंट होती. जाऊन येऊन जवळपास १४० किमी चा प्रवास झाला आमचा.

Runkeeper Ride… Saddle time

आधीची प्रॅक्टिस चांगलीच कमी आली. ईशान चा रोजचा व्यायाम देखील यात कमी आला . श्रीनिवास आणि ईशान रोज व्यायाम करतात ज्यात ईशान रोज ५० सूर्यनमस्कार घालतो ज्यामुळे त्याचा स्टॅमिना वाढायला मदत झाली.

या सगळया राईड मध्ये श्रीनिवास ची सुद्धा कमाल झाली. जरी तो रेग्युलर सायकल चालवणारा, व्यायाम करणार असला तरीही,  तो आणि त्याचा मित्र स्टॅचू ऑफ युनिटी,  गुजरात ते मुंबई अशी 500 किमीची ride करून आले होते. २९ तारखेला श्रीनिवास मुंबईहून चिपळूण ला आला आणि ३० ला आम्ही परत नवीन राईड सुरु केली. तेव्हा त्याच देखील खूपच कौतुक.

नियमित व्यायाम हा किती महत्वाचा हे परत एकदा पटलं.

हि राईड तर ठरवल्याप्रमाणे झाली. आता अजूनही अनेक ठिकाणं बोलावत आहेत. कुठे कसं जायचं याचे अनेक प्लॅन बनतायत.

बघूच आमची सायकल आम्हाला पुढे कुठे नेते ते…….

धनश्रीनिवास

4th January, 2020

77 thoughts on “Chiplun – Kolthare – Chiplun

 • अप्रतिम लेख. खूप मस्त लिहिलं आहे 👌👌

  • श्रीनिवास, धनश्री आणि ईशान , the cycling family मस्तच !! सायकल च्या वेडात हे तीन वीर निघाले. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा! असेच नविन नविन रस्ते पार करा!! धनश्री ब्लॉग मस्तच आहे.. डोळ्यासमोर तुमचा प्रवास उभा रहातो. All the best for your next ride. Keep paddling and keep blogging 😀

 • ईशान च सगळ्यात आधी खूप कौतुक करणं बिना गिअर क्या सायकल ने घाट चढण ही काही खाऊ ची गोष्ट नाही. गिअर वाल्या सायकल ने सुद्धा फेफे उडते.
  श्रीनिवास बायकोला एंकरेज केल्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद. अश्या अडवेंचर्स साठी नवऱ्याची साथ ही खूप महत्त्वाची असते. धनु तू पण पहिल्यापासून धाडसी आहेसच. अशीच लांब लांब जात जा आणि त्याच सुंदर वर्णन आम्हाला घर बसल्या तुझ्या लिखाणातून अनुभवू दे.
  Loads of love and good luck for future adventures

 • बेस्ट…!!!
  जास्त काही लिहिणार नाही…
  किंबहूना, लिहू शकणार नाही…

 • भन्नाट, इशान चे खास कौतुक.
  बगेर्गैर (गिअरविना ) ने असा सराव केला तर मास्टर होइल. वर्णन ही छान केलय.

 • मी पण १ जानेवारी ला त्याच रुट वर होतो पण कार ने, अवघड पण सुंदर रस्ता आहे..ईशान च खूप कौतुक..!

 • प्रवासाचा वृत्तान्त आवडला. ईशानला अभिनंदन सांगा. अशा अनेक राईड साठी शुभेच्छा!

 • सायकल वेडे गोखले कुटुंबिय यांचे यशस्वी सायकल सफरी साठी खुप खुप अभिनंदन…कौतुकास्पद कामगिरी..
  सायकल राईड चे सुंदर लेखन केले आहे ..वाचुन आम्ही पण राईड चा आनंद घेतला..

 • very well written mitra!
  I hope you remember our cycling deal at wadeshwar 🙂
  still using Trek?or sold out?

  • Hi Prashant! How can I forget that? Sold and moved to Hybrid cum rodie later due to knee injury moved to E Bike… but cycling is still on!

 • Superb Srinivas….!!!
  This is really amazing and proud full moment for you and your family…!!!
  Special best wishes to Eshan for his contribution toward completing the task.
  Positively looking forward for the next goal and upcoming articles.
  Keep it up cycling family….!!!!

 • छान लिहिलंय!
  सायकलिंग फॅमिलीला पुढील कामगिरींसाठी हार्दिक शुभेछा! 😎👍💐

 • Amazing ride especially about ishaan, I am very proud of him ,he has taken cycling at very small age group…. commendable….best of luck for all ur future rides . would like to see ishaan soon in B.R.Ms with his dad and mummy……
  I myself is a cyclist and TRIATHELET…….
  RIDE SAFE RIDE STRONG.

 • धनू छान लिहिलंयस…. कौतुक आहे इशान सह तुमचेही…. आता एकदा पालशेतला या…. नारायण

 • Khasaliii bharii family aahe raav tumhii.. I salute to all of you.. Sagal chitra dolyasamor ubha rahil etak sunder lihal Pan aahes.. keep It up “Dhanu shrinivas ” 🙂

  IshaN la tr 1000000….likes

 • अरे वा छान मस्तच ,धनु ,श्रीनिवास, ईशान,
  सर्वांचे कौतुक ,,
  फारच छान आपला उपक्रम आहे,
  पर्यावरणाचे पण संतुलन पण साधता आहात,
  आपल्या सर्वांना धन्यवाद,
  अभिनंदन ,, आणि शुभेच्छा,,

 • तुमच्या तिघांचे खूप अभिनंदन !!!!!💐💐 अतिशय सूंदर लिहिलयस, अशीच छान लिहीत रहा आणि सायकल चालावतनाचा आनंद घेत तुमचे नाव एक दिवस गिनीज बुक मधे येवो हि सदिछः !!!👍

 • तुमच्या तिघांचे खूप अभिनंदन !!!!!💐💐 अतिशय सूंदर लिहिलयस, अशीच छान लिहीत रहा आणि सायकल चालावतनाचा आनंद घेत तुमचे नाव एक दिवस गिनीज बुक मधे येवो हि सदिछः !!!👍

 • तीन सायकलस्वारांची प्रवासकथा अतिशय रंजक झाली आहे. पुढील अनेक प्रवसांना आणि प्रवास वर्णनांना खूपखूप शुभेच्छा!

 • सगळ्यात जास्ती कौतुक श्रीनिवास भाऊजींचे, त्यांनी नुसता स्वतः नाद धरला नाही तर यशस्वी रीतीने बायकोला आणि मुलाला पण नादी लावलंनी.
  मस्त!💐💐

 • फार सुंदर ओघावंत लिखाण. सायकलिंग हा खरंच खूप आनंददायी प्रकार आहे. हा आनंद तुम्ही भरभरुन लुटावा आणि याची लागण त्या परिसरात अनेकांना व्हावी. ईशान च विशेष कौतुक!

 • सही….. श्री आणि फॅमेली

  खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्वांच.

  Gr8 efforts & passion

 • एक झपाटलेलं आयुष्य….जिवंतपणा … Jealous of u dear…Keep it up !!!

 • मस्त खूप खूप अभिनंदन!
  खऱ्या अर्थाने एक विचाराचे एक आवड असणारे आणि ती जोपासणारे कुटुंब आणि धनु ने खूप खूप मस्त प्रवाही आणि प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील असं लिहिलंय.
  मी काय आणि कशी प्रतिक्रिया देऊ असा प्रश्न मला लिहितांना पडतोय
  प्रतिक्रियेसाठी शब्द सुचत नाहीत तेव्हा ते काम खरच कौतुकास्पद आणि शब्दांच्या पलीकडले असंच असतं!!!
  त्यामुळे पुन्हा खूप अभिनंदन तुम्हा दोघांचं आणि कौतुक ईशान चं!!

 • केवळ अप्रतिम….
  वा वा असल्या प्रवास कथेचं वर्णन ऐकताना तो रस्ता ते चढउतार आणि दमछाक याची कल्पना येते.
  आणि तुम्ही हे सर्व अनुभवलेत ह्यातच तुमचं यश आहे.
  ही कथा म्हणण्यापेक्षा अनुभव असंच मी म्हणेन.
  आणि अश्याच अनेकानेक अनुभव आम्हाला ऐकायला,वाचायला आणि तुमच्या रूपाने अनुभवायला मिळतील हे नक्की..
  Bravo: team gokhale
  Carry on

 • धनश्री, श्रीनिवास आणि ईशान, सर्वांचे खूप खूप अभिनंदन.. अशीच ऊंच ऊंच भरारी घेऊन, ग्रीनीच बुक मध्ये आपल्या प्रवासाची नोंद करण्यात यावी हीच ईच्छा💐💐

 • खूप,खूप कौतुक प्रथम तुम्हा तिघानचे, तुमच्या या सायकल वेडा चे mhanaa, ध्यासा चे mhana वर्णन करायला शब्द apure पडतील निदान मला तरी,फक्त एकच मनापासून वाटते गिनिष बुक मधे तुमची family नक्कीच रेकॉर्ड करणार एक दिवस. श्रीनिवास चे आहेच पण तुझे अन इशानचे विशेष कौतुक,असेच विक्रम कारित रहा पण तेवढी च tabetichi ही काळजी घ्या,परवलीचे वाक्य keep it up

 • १४० किलोमीटर!!!!!! अथांग उत्साह आणि पॉवरफुल इच्छा यांचं करेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हे तीन सायकलस्वार. 🙏🙏🙏

 • निवास तू तर ग्रेटच आहेस सायकलिंगमध्ये पण धनश्री आणि यशाची पण कमाल आहे, hats off to all three of you.

 • ओघवती भाषा. लिखान सुंदर. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि ईशानचे विशेष कौतुक. फोटोस पण मस्त.

 • सर्व गोखले कुटुंबियांचे अभिनंदन .प्रवासाचे वर्णन फार सुरेख केले आहे.पृथ्वीला सायकलने प्रदक्षिणा करण्याची तुमच्यात हिम्मत आहे.पुढील सर्व मोहिमाना शुभेच्छा.परत एकदा सर्वांचे अभिनंदन .ईशानचे विशेष कौतुक.

 • Hats off to three of you. Three cheers for Ishan. Great task for his age. Keep it up. All the best for all future rides.

 • Congrats Ishan&Gokhale family, you have given a good message of fitness to everyone,specially Ishan, when children of his age spend their time in watching tv &playing mobile, keep it up

 • मस्तच…. हे वाचून सर्वांच सायकल प्रेम जागृत होईल..

 • श्रीनिवास, धनश्री आणि ईशान शाब्बास आहे तुमची. सध्या च्या social media मध्ये अडकलेल्या पिढीत तुमच्या सारखे तरुण आपल्या पिल्लू ला घेऊन अशी आगळी वेगळी सफर करते. तुम्हा तिघांना सलाम. Proud of you.
  ब्लॉग खूप छान लिहिला आहे. तुमचे कौतुक प्रत्यक्ष भेटून करायचे आहे .तेंव्हा भेटू.

 • अप्रतिम लेख. 👌👌
  खूप मस्त लिहिलं आहात

  तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि ईशानचे विशेष कौतुक👌

 • सुंदर.. तुमच्या सोबत असल्या सारखं वाटलं..
  I so wish to be a part of this journey.
  Enjoy! Lots of blessings for Eshan..🎈🎊
  श्रीनिवास साठी सोप्पं आहे .. पण वहिनी तुमचेही कौतुक..☺️

 • धनश्री
  खूप छान लिहिलं आहेस. उत्सुकता वाढवत सगळे चित्र डोळ्यासमोर आणत लेख वाचकास पुढे घेऊन जातो. फोटो सुंदर आणि एकदम परफेक्ट ठिकाणी पोस्ट झाले आहेत.

  ईशान चे विशेष कौतुक. एवढया छोट्या वयात , रोज प्रॅक्टिस करणे, ना कंटाळता ७० किलोमीटर सायकल चालवणे ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. त्याला माझ्यातर्फे कौतुकाची शाबासकी दे

  मला श्रीवासचे देखील कौतुक वाटते. तुला व ईशानला motivate केले. शिवाय एवढ्या छोट्या मुलाला घेऊन प्लांनिंग करणे , challenging आहे. तुम्ही दोघांनी ही रिस्क घेतलीत. त्याला encourage केलेत .
  त्यामुळे तुम्हा दोघांचे , विशेष कौतुक.

  अशीच लिहीत राहा

 • Khupch bhari lihilay …!!!!
  Amcha cycling madhla Guru ahesch tu..!!!
  Pan tuzya familyne sudha ha chand chan pane jopaslay..!👍👌👌😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *