“कुणीतरी आहे तिथं!”

एक भय़ाण काळोखी रात्र…

सगळं ठाणे शहर पहाटेच्या साखर झोपेत…

बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस…

दूर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरुन येणारा गाड्यांचा आवाज…

हायवेच्याच सर्विस रोडला लागून उभ्या असलेल्या दिपज्योती सोसायटी मधील एका Flat मधे भयाण शांतता…

त्या भयाण शांततेत मानव सदृश्य आकृति मेल्यासारखी पडलेली एकदम गाढ अशा झोपेत पण त्या आकृतिची झोप अत्यंत सावध असावी!

साधारण पहाटे ०२.५० च्या सुमारास त्या आकृतिला कसली तरी चाहूल लागली आणि ती आपल्या जागेवरूनच कानोसा घेऊ लागली आणि तेवढ्यातच त्या भयाण शांततेला चिरून टाकणारा ट्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण असा आवाज झाला…

“कुणीतरी आहे तिथं!”

# कोण असावं अशा अवेळी?
# इथे कसं काय कुणी येऊ शकतं?
# का आलं असेल?
# जे आलंय त्याचा / तिचा इथे अशा अवेळी येण्याचा हेतू काय असू शकेल?

असे अनेक प्रश्न त्या आकृतिच्या मनात येऊन गेले!

एखादा मानव प्राणी घाबरून गेला असता मात्र पण ती आकृति अतिशय शांत होती. तिने आपला लांब असा हात अजूनच लांब केला आणि बेडरूमचा दरवाजा हळूच ढकलला. झोपल्या जागेवरूनच त्या आकृतिने बाहेर नजर टाकली आणि पाहिलं तर काय?

आकृतिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना… ज्याची अपेक्षाही नव्हती असं कांहीतरी तिथे वावरत होतं!

समोरच्या passage मधे एक काळा उंदीर ’मांजराच्या पावलाने’ फ़िरत होता. मांजराच्या पावलाने फिरणारा तो काळा उंदीर बघताच ती आकृति हळूच उभी राहिली आणि क्षणार्धात Bedroom, Hall आणि Kitchen यांना जोडणार्या Passage मधे झेपावली!

त्या आकृतिची चाहूल लागून तो उंदीर Hall दिशेने पळू लागला.

त्या मानव सदृश्य आकृतिने वीजेच्या चपळाईने ३ पावलात किचन गाठले आणि तिथे लपवून ठेवलेली खास हत्यारं बाहेर काढली (ही हत्यारं म्हणजे भजी तळायचा झारा आणि आमटी / वरणाची पळी) आणि चटकन हाल मधे पाऊल टाकले. आकृतिने बघितले की तो उंदीर एका वायर वरून खिडकीतील फटीकडे जायचा प्रयत्न करत होता एका झटक्यसरशी आकृतिने ती खिड्की बंद केली आणि वायरीला झटका दिला. उंदीर खाली पडला आणि रद्दीच्या ढिगार्यात नाहीसा झाला!

ती आकृति भेसूर हसली आणि मनोमन म्हणाली “अब आया उंदीर रद्दी के नीचे!” आकृतिने व्यूहरचना केली, आपली पोझिशन घेतली आणि पायानेच रद्दीच्या ढिगार्याला लाथ मारली त्याचक्षणी उंदीर बाहेर आला. त्याला कळून चुकलं होतं की आकृतिच त्याच्या जीवनाचा अंत करणार आहे! पण तरीही एक शेवटचा प्रयत्न म्हणून धावून बघू असं मनाशीच म्हणून उंदीर जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागला!
पण ती आकृति त्याला संधी देणार होती? छे! शक्यच नाही!
वीजेच्या चपळाईने आकृतिने आपल्या उजव्या हातात धारण केलेल्या विशेष हत्याराचा (भजी तळायचा झारा) अचूक फोर हण्ड वार केला. ता वाराचा फोर्स एव्ह्ढा होता की, तो उंदीर समोरच्या भिंतीला जाऊन आपटला आणि आचके देत आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजू लागला आणि सरतेशेवटी मेला.

पुन्हा एकदा भयाण शांतता!

त्या आकृतिने एक असूरी हास्य केले 🙂 ही!हा!हा!हा!हा!हा!हा!हा! आणि आपल्या मोबाईलमधे त्या उंदराचे हत्यारांसहीत फोटो घेतले. मग उंदीराच्या शेपटीला धरून मगाशी बंद केलेली खिडकी उघडली आणि त्या उंदराला खाली भिरकवून दिले!

10550844_789879291063207_8354069687311935760_n

भय़ाण काळोखी रात्र हळू हळू सरत चालली होती
सगळं ठाणे शहर अजूनही पहाटेच्या साखर झोपेतच होतं
बाहेर पाऊस कोसळतच होता आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरुन येणारा गाड्यांचा आवाजही तसाच होता! त्याच हायवेच्याच सर्विस रोडला लागून उभ्या असलेल्या दिपज्योती सोसायटी मधील एका Flat ची खिडकी बंद केली गेली आणि त्या Flat मधे पुन्हा ती भयाण शांतता प्रस्थापित झाली.

जणू कांही झालचं नाही अशा आविर्भावात ती आकृति शांतपणे बेडरूम मधे आली, What’s App वरील मेसेजेस चेक केले आणि परत झोपी गेली. 🙂

श्रीनिवास गोखले

5th August, 2014

 

तळटीप: “आमच्याकडे उंदीर खूप झालेत तेही मारायला आकृति पाठवा!” – असल्या फाल्तू कमेंटस करू नये. तुमच्याकडे येऊन तुमचे उंदीर मारत बसायला ती आकृति रीकामटेकडी नाहिए! 🙂

2 thoughts on ““कुणीतरी आहे तिथं!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *