“भीक नको पण कुत्रा आवर!”

“भीक नको पण कुत्रा आवर!”

दिवाळीच्या निमित्ताने What’s app वरील पडीक जनतेने डोक्याला shot लावला आहे…

दिवाळी येण्या अगोदर घराची साफसफाई कशी केली, त्यात किती बिझी होतो / होते,  मग धूळीमुळे मला किती त्रास झाला  वगैरेची चर्चा (एरवी या लोकांकडे काय उकीरडा असतो की काय अशी शंका येते)

यानंतर सुरु होतात ते अचाट कल्पनेने भरलेले मेसेजेस;

काय तर म्हणे “सोनेरी किरणे, सोनेरी माणसे, दिवा लावू दारी, पैशाचा, सुखाचा आणि कशा कशाचा वर्षाव, सगळया इच्छा आणि आकांक्षांची पूर्तता वगैरे वगैरे… ”

अशा उगाचच “ओढून ताणून कपाळाला लावल्यासारख्या लाईन्स!” 

पहिली आंघोळ (एरवी वर्षभर आंघोळीच्या नावाने बोंब असते की काय?)

फराळाचे टाकलेले फोटो आणि मग कसं बनवलं याची चर्चा.

मग पिसाळल्यासारखे वेगवेगळ्या पणत्या, कंदील आणि बाया यांचे फोटो येतात.

उच्छाद मांडलाय लोकांनी नुसता!

“भीक नको पण कुत्रा आवर!” या म्हणीप्रमाणे “तुमच्या दिवाळी विशेस नको पण फाल्तू मेसेजेस आवर!”

हे सगळं सांगून कांही उपयोग होईल असं नाही. ते म्हणतात ना “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे!”

* * * * * * * * * * * * * * * * ** * असो! सर्वांना शुभ दिपावली! * * * * * * * ** * * * * * * * * * * * * *

श्रीनिवास गोखले
२२-१०-२०१४

4 thoughts on ““भीक नको पण कुत्रा आवर!”

  • हा हा हा !!! अगदी सहमत !!!! काही लोक तर रविवारच्या शुभेच्छा ! मंगळवारच्या शुभेच्छा!! संकष्टीच्या शुभेच्छा!!! काहीही शेअर करत असतात . मला आश्चर्य वाटत या लोकांना एवढा वेळ कुठून मिळतो ?

  • 50% सहमत
    शुभेच्च्या कशाही असो त्या मनापासून दिल्या पाहिजेत
    असो शिन्या माझ्याकडून तुला लाख लाख दिवालिच्या शुभेच्च्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *