देव मोठा की देवस्थान?

त्या दिवशी मला एकाने विचारलं की, “या वीकेन्डला आम्ही शिर्डीला जातो आहोत तर तू येणार आहेस का?”

यावर माझं उत्तर अगदी सरळ होतं. मी म्हटलं “धंद्याच्या देवस्थानांच्या दर्शनाला मी कधीच जात नाही!”
हे ऐकून तो वैतागला.
मला ना या लोकांचं कांही कळतंच नाही…..
 
* प्रभादेवीच्या सिद्धिविनायका समोर ५ तास उभं राहून दर्शन घेतलं…
* आज काय लालबागच्या राजाच्या दर्शनाला १२ तास रांगेत उभं राहून दर्शन घेतलं…
* शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण दिवस रांगेत…
* तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यसाठी २ दिवस रांगेत….
१२ तास – २४ तास- २ दिवस रांगेत? तरं म्हणे की, “हे सगळे पावतात!
मला प्रश्न पडतो, “मग, घरात असलेले देव काय शाप देतात?” 
लोकं तर या अशा सुप्रसिद्ध ठिकाणी सोनं, चांदी, हिरे, मोती, नोटा अशा अनेक किंमती वस्तू दानपेटीत टाकुन देतात कारण काय तर म्हणतात की, “तुम्ही जेव्हढं दान करता त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळतं!
तुम्हाला नाही वाटत की, देवस्थानांचं अक्षरश: बाजारीकरण झालं आहे म्हंणून?
आणि काय संबंध आहे हो याचा?
खरंच असं असतं तर भारत कर्जमुक्त झाला असता, शेतकर्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि बरंच कांही… (शाळेत एक निबंध स्पर्धा आयोजित करता येऊ शकेल यावर)
 
जग कुठे चाललं आहे आणि आपण काय करतो आहोत?
देवापेक्षाही देवस्थानांना दिलं जाणारं अवास्तव महत्व, तिथे लागणारी विक्रमी वेळेची रांग, तिथे होणारा अफ़ाट (बेहिशोबी) पैशाचा वर्षाव आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे तथाकथित दान करुन (लाच देऊन) त्या देवालाच आपल्या पापात भागीदार करुन घ्यायची एकच चढाओढ या सर्व गोष्टींचा अतिरेक होत चालला आहे. सुशिक्षित लोकांचाही यात सहभाग असतो.
अहो, पुण्यचं कमवायचं असेल तर कितीतरी चांगले पर्याय उपलब्ध आहेत जे केल्यामुळे देव खरंच प्रसन्न होऊ शकेल.
हे सगळं बघून ‘देऊळ’ चित्रपट आठवतो आणि त्यातील अतिशय मार्मिक असं गाणं “देवा तूला शोधू कुठं?” आपसुकपणे ओठांवर येतं! Who is great? the GOD or Place of the GOD?
 
That day someone asked me whether I am interested in coming to Shirdi for SaiBaba’s darshan!
My answer was “I don’t like to visit the commercial places!”
He was furious with this answer.
I sometimes, literally don’t understand about people.
They stand for 4-6 hrs in a queue to take a 5-10 seconds glimpses of Siddhivinayak at Prabhadevi…
They stand for 10-12 hrs in queue to take a 5-10 seconds glimpses of Lalbagacha Raja…
They stand for a 1 day also in a queue to take a 5-10 seconds glimpses of Saibaba at Shirdi…
They stand for a 2 days also in a queue to take a 5-10 seconds glimpses of Tirupati Balaji…
12 hrs – 24 hrs – 2days in a queue?
When asked they say, “We visit this place because it blesses you with the things that you asked for!”
And in my mind one more question arises “Then, what about the same deity’s idol kept at your home? Does it curse you?”
People literally take off their Gold lockets, Bangles, Bracelets, Diamonds and many more valuable stuff and put it in the Donation Box and claim that “If you donate X amount you will get double of what you have donated!” – these irritates me a lot.
I mean, is it some kind of a grocery shop or something like that?
I really wonder why Indian Govt is still in Debt for so many years? Why farmers are committing suicide? And many more… (A good subject for Essay competition though)   
Anyways…..My point here is, “Why to bribe that deity to get something in return i.e. double (minimum)?”
           
Today, if you see this places of worship or temples then you will clearly see that their Management is greater than GOD.
It is commercialized. it has record breaking queues, grand collection of valuables (mostly black money) and the considerable part is people bribe (donate) the GOD itself and ask for his blessings.  
There are many options which will surely make the GOD happy and will give you his blessings.
Looking at this GOD must be saying, “I have to forgive people since few of them are not even know what exactly they are doing!”

6 thoughts on “देव मोठा की देवस्थान?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *