उपासाचा साबुदाणा…

Sabudana

उपास म्हटलं की, भक्तिभावाबरोबर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे साबुदाणा!

चविष्ट साबुदाणा खिचडी, खमंग साबुदाणा वडे (मुंबईतील Hotel मधे साबुदाणा गोळे मिळतात)!

या उपासाच्या साबुदाण्याबद्दल मला नेहमीच प्रश्न पडतात;

१. हा साबुदाणा आला कुठून?

२. कांही पौराणिक कथांचा संदर्भ आहे का जेणेकरून तीच प्रथा आजही चालू आहे (जसं रावण दहन)?

३. लोक उपासाला साबुदाण्याचा सढळहस्ते वापर कसा करतात?

या प्रश्नांची उत्तरं शोधायचा केलेला हा अल्पसा प्रयत्न;  

१. हा साबुदाणा आला कुठून?

–> जसा हापूस आंबा भारतात आला आणि इथलाच झाला तसाच साबुदाणाही आला असावा नाही का?

–> https://en.wikipedia.org/wiki/Tapioca
–> https://en.wikipedia.org/wiki/Sabudana

 

२. कांही पौराणिक कथांचा संदर्भ आहे का जेणेकरून तीच प्रथा आजही चालू आहे (जसं रावण दहन)?

–> माझ्या वाचनात तरी राम वनवासात असतांना, “अगो सीते, आज उपास करावा म्हणतो, जरा साबुदाणा खिचडी टाक बघू!” असा संवाद आलेला नाही!

किंवा अर्जुनाने द्रौपदीला “साबुदाणा वडे कर गो!” म्हणून सांगितलं आहे!

अगदी नजीकचं म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातही साबुदाणा खिचडी होती का ही शंकाच आहे(आपली खिचडी म्हणजे मूगातांदुळाची)

म्हणजे प्रथाही नसावी! (Experts can throw light on the same)

३. मग या साबुदाण्याला एव्हढं महत्व प्राप्त कसं झालं? 

–> हा एक संशोधन करण्यासारखा विषय आहे कदाचित एखाद्या हुशार व्यापार्याने साबुदाण्याची पुडी सोडून दिली असणार (जशी संतोषी मातेच्या नावाची पत्र यायची आणि तसंच पत्र ७ जणांना पाठवा नाहीतर देवीचा कोप होईल असं सांगितलं जायचं असल काहीतरी झालं पाहिजे! (हा कोप होईल म्हणून आपापल्या फेसबूक wall, Whatsapp वर messages आणि photos share शेअर करणारे YZ लोक आजही अस्तित्वात आहेत बरं का!)

तसं बघायला गेलं तर साबुदाणा कसा बनतो हे सांगणारा अजून एक मेसेज आहेच त्यामुळे साबुदाणा VEG की NONVEG हा संभ्रम निर्माण होतोच! 

माझी आज्जी “निर्जळी” उपास करायची अगदी तोंडात आलेली लाळसुद्धा थुंकून टाकायची!
फक्त पाणी पिऊन देखील उपास करतात,
तर कांही लोक फळं खाऊन राहतात (फलिहारी)!

हे खरे उपास!

नाहीतर आपण “एकादशी दुप्पट खाशी तरी म्हणे मी उपाशी!”

थोडक्यात काय “आम्ही लोक हिंदू कमी आणि भोंदू जास्त आहोत!” आम्ही अंधानुकरण करत राहतो!

असो, चालायचंच! मला भूक लागली आहे, जरा खिचडी चापून येतो! 🙂 🙂 😉

14 thoughts on “उपासाचा साबुदाणा…

 • अगदी बरोबर …. साबुदाणा हा भारतीय नाही ….. त्याचबरोबर शेंगदाणे, बटाटा, रताळे, काजू हेही भारतीय नाहीत …. ते पाच सहाशे वर्षांपूर्वी भारतात आले आहेत ….. गंमतीची गोष्ट अशी आहे की या सर्व पदार्थांनी उपवासाच्या पदार्थांमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे …. घरकी मुर्गी दाल बराबर ….!

 • उपासाच्या वेळी जेवणा पेक्षा जास्त साबूदाना खिचड़ी खायची आणि मग काहीतरी भारी केल्याचा आव आणायचा.

 • अंधनुकरन करत राहतो हे मात्र अगदी खरं.
  चला खिचडी खाऊ, परत पुढच्या एकादशी ची वाट पहावी लागेल.

 • मुद्दा कितीही खरा असला, तरीही उपवास करणारी किती मंडळी या बाबतीत सहमत होतील?

  • True! We have a great History and traditions but, this days we follow anything blindly without checking it!

 • छान लिहितोस श्रीनिवास !!!
  बाकी इतिहास कशाला उकरा ?? आवडला पदार्थ तर करावा नि खावा! सोप्पं आहे ! 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *